….त्या मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत करावी रेल्वेमंञी यांनी राजीनामा द्यावा – खोतकर
जालना : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाना शिवारात मालवाहु रेल्वेखाली येवुन परराज्यातिल १६ मजुरांचा मृत्यू झालेला आहे. भारत सरकारला दोषी मानत शिवसेनेचे माजी मंजी अर्जुन खोतकर यांनी मृत पावलेल्या मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत सरकाने करावी व रेल्वेमंञी पियुष गोयल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
सरकारच्या चुकीमुळे या मजुरांचे प्राण गेले असुन याची पुर्ण जबाबदारी त्यांनी घ्यायलाच पाहीजे असे ते म्हणाले.