…त्या जवानांविरोधात सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल

जालना (प्रतिनिधी) – देशभरासह महाराष्ट्रामध्ये कोरोना या संसंर्गजन्य विषानूने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होत आहे. अशातच कोरोनाशी लढा देणार्‍या पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या दोन जवानांनाही कोरोना लागण झाल्याची धक्कादायक माहिती जालन्यामध्ये समोर आली आहे.
कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी पोलीस आणि राज्य राखीव दलाचे आपले जवान जीवाची बाजी लावत आहे. पण, पोलीस आणि जवानांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जालन्यात राज्य राखीव दलाच्या जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. हे दोन्ही जवान मालेगावमध्ये बंदोबस्तावर होते. पण, हे दोन्ही जवान मालेगाव बंदोबस्तावरून पळून आल्याचं खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही जवानांविरोधात सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असतांनाच सहा दिवसांपूर्वी अचानक जिल्ह्यात 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हावासियांमध्ये खळबळ उडाली होती.
या पाचपैकी 4 रुग्ण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीनमधील जवानांचा समावेश होता. दरम्यान, ते जवान मालेगाव येथे बंदोबस्तावरुन परतलेले होते. दरम्यान, त्यापैकी 2 जवान मालेगाव येथे बंदोबस्त ड्युटीवरून कोणालाही न सांगता पलायन करून परस्पर जालन्यात परतल्याचं खळबळजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी राज्य राखीव पोलीस दलाचे निरीक्षक जगताप यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कौळासे करीत आहे.

36 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *