जालना

त्या घटनेतील हल्लेखोर पोलीसाचा ताब्यात; कुंडलवाडी पोलीसांची कामगीरी

कुंडलवाडी (प्रतिनिधी) ~ 6 मे 2020 रोजी कुंडलवाडी शहरात ईसम नामे पोतन्ना भुमना आरशेवार वय 55 वर्ष हे त्यांचे बांधकामाचे ठिकाणावर झोपलेले असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या डोक्यात कु – हाडी सारख्या हत्याराने वार करुन त्याचेवर प्राणघातक हल्ला केला होता.सदर घटनेवरुन कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुरन 72/2020 कलम 307 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता . सदर हल्यामुळे उपचारादरम्यान जखमी यांचा दि.8 मे 2020 रोजी मृत्यु झाल्याने सदर गुन्हयात कलम 302 भांदवीप्रमाणे वाढ करण्यात आली होती.सदर गुन्हा अज्ञात ईसमाविरुद्ध दाखल होता व गुन्हयाचे आरोपीने घटनास्थळावर पुरावा सोडले नव्हते अश्याही परिस्थीतीत पोलीस अधिक्षक विजय कुमार मगर व अप्पर पोलीस अधिक्षक पवार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील,उप विभाग धर्माबाद यानी केलेल्या मार्गदर्शनात सपोनी सुरेश मान्टे ,सपोउनी विशाल सुर्यवंशी,सपोउपनी ईंगळे,पोलीस नाईक महेश माकुरवार,पो.काँ गंधकवाड,पोकाँ शेख नजीर,पो काँ अनमुलवार यानी अंत्यत बारकाईने तपास करुन गुन्हा उघडकीस आणुन आरोपीस गणपत लिंगन्ना आरशेवार वय 45 रा.पोचम्मागल्ली कुंडलवाडी यास अटक केली आहे.
सदरील आरोपीस चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आनले असता चौकशीतून निष्पन्न झाले.अशी माहीती सपोनी.सुरेश मान्टे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *