LatestNews

तुळजापूर घाटात अपघात ; नेकनूर परिसरातील चार जण ठार !

नेकनूर : येथून सोलापूर येथे आयशर टेम्पोमध्ये कांदा घेऊन जात असताना तुळजापूर जवळ टेम्पोचा भीषण अपघात झाल्याने नेकनूर येथील टेम्पो चालक शेख सज्जाद वय 37 व कांद्याचे शेतकरी देवराव शिंदे वय 55 व ईतर एक जण जागीच ठार झाले व एक जण गंभीररीत्या जखमी झाल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याच समजत आहे. ही घटना आज पहाटे ०३:०० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातात नेकनूर येथील देवराव शिंदे व शेख सज्जाद यांच्या निधनाची बातमी कळताच नेकनूर मध्ये शोकाकुल वातावरण पसरले होते. शेख सज्जाद हे सर्वांचेच प्रचलित असल्याने सर्वांचेच लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच व्यापाऱ्यांनी आपले दुकाने व हॉटेल बंद केले. शेख सज्जाद यांची दफन विधी दुपारी उशिरा दर्गा मस्जिद येथे जनाजा नमाज अदा करण्यात आली आहे व दर्गा मज्जित कब्रस्तान येथेच त्यांचा दफन विधी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *