*तुम्ही मला प्रेम आणि आशीर्वाद दिलेत, मी तुमचा विश्वास कायम जतन करीन – ना. धनंजय मुंडे* *अत्यंत साधेपणाने कौटुंबिक वातावरणात व समर्थकांच्या उत्साहात ना. मुंडेंचा वाढदिवस साजरा* *प्रत्ये

परळी (दि. 15) —- : समाजकारण आणि राजकारणात मी आज उभा आहे त्यामध्ये जनतेचे मला मिळालेले अभूतपूर्व प्रेम व आशीर्वाद हीच माझी शिदोरी आहे. आज मी राजकारणात जो काही आहे तो जनतेच्या आशीर्वादाने व सर्व सहकारी-कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळेच आहे. अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करत राहून हे प्रेम व विश्वास जपून ठेवणे हे माझं आद्यकर्तव्य आहे असे भावनिक मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. परळी येथे ना. धनंजय मुंडे यांचा अत्यंत साधेपणाने व कौटुंबिक वातावरणात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ना. मुंडेंच्या आई रुक्मिणीबाई मुंडे, सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी औक्षण केले. त्यानंतर परळीतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने ना. मुंडेंचा हृदय सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी आ. संजय दौंड, ना. मुंडेंच्या आई रुक्मिणीबाई मुंडे, सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे, काकी कमलबाई मुंडे, बंधू श्री. अजय मुंडे, रामेश्वर मुंडे, अभय मुंडे, भगिनी सौ. उर्मिलाताई केंद्रे, सौ. मनीषाताई अजय मुंडे यांसह मुंडे कुटुंबीय उपस्थित होते. कोरोनाविषयक नियम व शिस्तीचे पालन करून नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड व सहकाऱ्यांनी या सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. पूर्वीच्या संघर्षाच्या काळात, ज्या सहकारी- कार्यकर्त्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही, माझी साथ देण्यामुळे त्यांना अडचणीत आणण्यात आले, त्या सर्व कार्यकर्त्यांचे माझ्या हृदयात स्थान आहे. कोविड विषयक निर्बंध असल्यामुळे जरी सतत भेटीगाठी होत नसल्या तरी माझ्यासाठी खस्ता खाल्लेल्या एकही सहकाऱ्याचा विसर पडू देणार नाही असा विश्वास ना. मुंडेंनी आपल्या सहकाऱ्यांना दिला. तसेच उपस्थित सर्वांचे त्यांनी हृदयपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, पत्रकार यांसह अनेक कार्यकर्त्यांनी ना. मुंडेंना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद महाराज केंद्रे यांनी केले. जन्मदिनाच्या निमित्ताने सबंध परळी शहर सजले असून, ना. मुंडेंचा जन्मदिन (15 जुलै) ते उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचा जन्मदिन (22 जुलै) असा सात दिवसांचा आरोग्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त आज परळी तसेच अन्य ठिकाणी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *