डॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक

डॉ. शालिनीताई कराड यांना मातृशोक

बाळूताई शामराव गदळे यांचे दुःखद निधन

परळी (प्रतिनिधी)
कराड हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.शालिनीताई कराड यांच्या मातोश्री बाळूताई शामराव गदळे यांना शुक्रवारी संध्याकाळी रात्री ११ च्या सुमारास देवाज्ञा झाली. मृत्युसमयी त्या ६८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या, आजाराशी झुंजत असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. दहीफळ (वाडमाऊली) येथे शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिक्षण महर्षी स्व.शामराव दादा गदळे यांच्या पत्नी आणि डॉ.शालिनीताई कराड यांच्या मातोश्री बाळूताई शामराव गदळे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. केज तालुक्यातील त्यांच्या राहत्या गावी दहिफळ (वाडमाऊली) येथे त्यांच्यावर शनिवारी सकाळी दहा वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहेत. धार्मिक आणि सामाजिक कार्याची बाळूताई यांना प्रचंड आवड होती. स्व.शामराव दादा गदळे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याला त्यांनी नेटाने पुढे नेले. अतिशय शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सुपरिचित होत्या. बाळुताई यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगी डॉ.शालिनीताई कराड, बीड येथील दीप हॉस्पिटलचे संचालक डॉ.शशिकांत व इंजि.शरद गदळे अशी दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवकृपा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक श्री सकाहरी तात्या गदळे यांच्या त्या भावजय होत्या व केज तालुका भाजपा युवा नेते राहुल गदळे यांच्या त्या काकी होत्या.
गदळे, कराड आणि जाधवर परिवारावर कोसळलेल्या
दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो.

42 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *