डॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक
डॉ. शालिनीताई कराड यांना मातृशोक
बाळूताई शामराव गदळे यांचे दुःखद निधन
परळी (प्रतिनिधी)
कराड हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.शालिनीताई कराड यांच्या मातोश्री बाळूताई शामराव गदळे यांना शुक्रवारी संध्याकाळी रात्री ११ च्या सुमारास देवाज्ञा झाली. मृत्युसमयी त्या ६८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या, आजाराशी झुंजत असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. दहीफळ (वाडमाऊली) येथे शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिक्षण महर्षी स्व.शामराव दादा गदळे यांच्या पत्नी आणि डॉ.शालिनीताई कराड यांच्या मातोश्री बाळूताई शामराव गदळे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. केज तालुक्यातील त्यांच्या राहत्या गावी दहिफळ (वाडमाऊली) येथे त्यांच्यावर शनिवारी सकाळी दहा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले.