डॉ,बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी ; सुरेश कांबळे!

आष्टी : विश्वरत्न डॉ , बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केलेल्या आज्ञात इसमावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी घाटपिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय लहुजी सेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख सुरेश कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे याआधीही कित्येक वेळा राज्यभरात असे पुतळा विटंबना चे प्रकार घडतात अशा महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या वर जर कठोरात कठोर कारवाई झाली तर पुतळा विटंबना करणाऱ्या वर जरब बसेल बर्दापूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना काही जातिवाद यांकडून केली आहे हे लोक जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर वेळीच कारवाई झाली तर असे प्रकार घडणार नाहीत व दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही तरी बर्दापूर येथे झालेल्या पुतळा विटंबना प्रकरणातील अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी जेणे करून त्यांच्याकडून पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत अशी मागणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुरेश कांबळे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *