” डेअरिंग बाज ,खासदार
अस नेहमीच म्हटल्या जात कि , वाघाच्या पिल्याला काहीच शिकवण्याची गरज नसते , त्याच्यात उपजत गुण असतात . तसच काही मानवी जिवा मध्ये असत . राजकारणात तर अनुभवास येत . स्व गोपीनाथ रावजी मुंडेना महाराष्ट्राचा राजकिय वर्तुळात ढाण्या वाघ म्हटले जात असे. संदर्भ यासाठी आज बीड जिल्हयाच्या राजकारणात खासदारांची डेअरिंग पाहता तसच काही वाटत आहे . कुठल्याही संकटात स्वःताच्या जिवाची पर्वा न करता जनतेच्या प्रश्नावर त्यांच्या हितासाठी खासदार अगदी धडाडीने पुढे येतात , कोरोना कोवीड रुग्णांच्या सोबत संवाद ते शेतकऱ्यांच्या बांधावर , कामचुकार प्रशासकिय अधिकाऱ्यांची कानउघडणी ते कार्यकर्ता सुख दुःख , हे सर्व पाहिल्या नंतर डेअरिंग बाज खासदार असच म्हणावे लागेल . मोठया भगिणीच मार्गदर्शन आणि साहेबांचा सक्षम वारसा चालवतांना , सत्ताधारी मालका पेक्षा जिल्ह्यात संकटात खासदारांचा वावर जास्तच म्हणावा लागेल बीड जिल्हा सध्या दोण संकटात सापडला आहे .कोरोना संकटाने धुमाकूळ घातला असताना, वाढत असलेला मृत्युदर हा चिंतेचा विषय .तर दुसरीकडे मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं. खरिपाचा हंगाम 100% वाया गेला? दोन्ही संकट जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या समोर आव्हान म्हणून उभा आहे.वास्तविक पाहता राजकारणात काम करणारी माणसं संकटात धावून येत नसतील तर मग त्याचा उपयोग? असं बरंच काही असतं .राज्यकर्ते संकटात धावून आले तर सामान्य जनतेला त्याचा दिलासा मिळतो. महाराष्ट्रात जेव्हा ,जेव्हा मानवाच्या जीवावर संकट येत, नैसर्गिक असेल, किंवा कुठल्याही प्रकारच असेल. ज्यामध्ये वाघासारखा धावून येणारा वाघ म्हणून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची आठवण सर्वांना येते .गारपीट झाली तेव्हा मराठवाड्याचा रात्रंदिवस दौरा करून स्वतः नुकसानीची पाहणी मुंडे साहेबांनी केली होती .गोदा वरीच्या पुरामुळे नुकसान झालं तेव्हा गोदा यात्रा काढली होती. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुंडे साहेब कंधार येथे पहाटे चार वाजता पोहोचले होते. तेव्हा साहेबांची वाट केशवरावजी धोंडगे पाहत बसले. मी स्वतः साहेबांच्या सोबत होतो, गाडीतून साहेब उतरल्याबरोबर धोंडगे म्हणाले होते महाराष्ट्राचा वाघ माझ्या गावात येत आहे. म्हणून मी वाट पाहत बसलो ,सर्वसामान्य जनतेला आता तुमच्या कडूनच अपेक्षा आहेत. हे शब्द होते धोंडगे यांचे? सांगायचं तात्पर्य जेव्हा केव्हा संकटे आली . मुंडे साहेब धावले गेले .तीच परिस्थिती वर्तमान काळात आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वाघाच्या पिल्याला शिकवण देण्याची गरज नसते .आज जिल्ह्यांमध्ये एकमेव नेता संकटात आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहे. तो म्हणजे आपल्या खासदार प्रीतम ताई मुंडे .मागच्या तीन दिवसापासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एकीकडे अद्याप कोणीही शेतकऱ्याचे नुकसान पाहणीला आलेल नाही .प्रीतम ताई मात्र संसदेचे अधिवेशन संपताच तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर आल्या .अनेक तालुक्यात जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.50 हजार रुपये प्रति हेक्टरी आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केली. दुसरीकडे करोना संकटाने जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला .समूह संसर्ग वेगाने वाढत आहे. अशामध्ये थेट कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांना दिलासा देण्याचे काम खासदार करतात, कौतुक यासाठी इतर पुढारी दवाखान्यात जाण्यासाठी भीती बाळगू लागले? मात्र स्वतः डॉक्टर असल्याने आणि मुंडे साहेबांचा वारसा, ज्येष्ठ भगिनी पंकजाताईचं मार्गदर्शन डोळ्यासमोर ठेवून .प्रीतम ताई स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट सेंटरला जातात .डॉक्टरांच्या सोबत संवाद साधतात, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखल तुडवित पिकाची पाहणी करतात. आणि यातच कुठे ?सुखदुःख झाल असेल तर त्या ठिकाणी भेटी देतात. याला म्हणतात नेतृत्व आणि त्याची डेरिंग. खरतर एक महिला खासदाराचा कौतुक करावं तेवढं कमी कारण पुरुष पुढारी घरात ,आणि महिला पुढारी शेतकऱ्यांच्या व रुग्णांच्या दारात ?असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. गोपीनाथ मुंडे यांना हेच अपेक्षित होतं .कारण सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून काम करण्याची शक्ती या वारसदार नेतृत्वात आहे. सर्वसामान्य जनतेची सेवा ,हा धर्म पाळताना कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद ठेवून. प्रशासनाच्या कामचुकार अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याच कामही त्या करतात. एकीकडे विरोधक खासदार कुठे गेल्या? असं म्हणतात मात्र हे काम पाहिल्यानंतर विरोधकाच्या तोंडातले दात निश्चित गळून पडतील अशी अवस्था आहे .बीड जिल्हा भाजपात खासदारांच्या भूमिकेनं उत्साह भरला असून सर्व भाजपाचे कार्यकर्तेही सेवाभावी वृत्तीतून काम करताना दिसत आहेत .पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली जिल्ह्यातील वाटचाल खऱ्या अर्थाने सेवाभावी आणि परोपकाराची निश्चित आहे. म्हणूनच डेरिंगबाज खासदार कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता सर्वसामान्य जनतेच्या हितरक्षणासाठी धावून जाताना दिसू लागले आहे. त्यांच्या दौऱ्यात वाहनांचा ताफा आणि एकूणच रुबाब पाहता लोकांना साहेबांची आठवण येवू लागली. दखल राम कुलकर्णी