Uncategorizedजालना

डाॅ.पठाण रूबीया खानम यांची समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती

कुंडलवाडी (प्रतिनिधी) – कुंडलवाडी जिल्हा परिषद हायस्कूलची विद्यार्थीनी डाॅ.पठाण रूबीया खानम जलालखान यांची नुक्तीच बिलोली तालूक्यातील कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या माचनूर येथील उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली.दि.3 जुलै रोजी कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी सातमवाड यांच्या उपस्थितीत रूजू झाले होते.आज माचनूर येथील उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारले.यावेळी उपकेंद्रातील आरोग्य सेवीका सौ.वानोळे,बिलोली पंचायत समिती उपसभापती शंकरराव परसुरे,सरपंच प्रतिनिधी राजू एडके,उपसरपंच प्रतिनिधी बाबाराव तानूरे,मुस्लिम कमेटी सदस्य अब्दूल रहमान साब,ग्रामपंचायत सदस्य बोनगीरे शंकर,लालू परसूरे,जगदीश फडसे.नागनाथ लालप्पा पाटील,दिगांबरराव फडसे,देवेंद्र उमाकांत पाटील,पोलीस पाटील शेख नुरमोहम्मद जलालसाब,तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव चटलूरे,आरोग्य मदतनीस श्रीमती सुमित्रा चरके आदींनी त्यांचे शाळ श्रीफळ देवून यथोचित  सत्कार केले. विशेष म्हणजे डाॅ.पठाण रूबीया खानम हे जिल्हा परिषद हायस्कूल लोहगाव येथील कार्यरत सहशिक्षक जलालखान पठाण सर यांची मुलगी असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळंदी कार्यरत मुख्याध्यापक शेख सलीम सर यांची सुन होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *