डाबी येथे लाईटचा बिघाड; संपूर्ण परळी शहर अंधारात युद्धपातळीवर काम सुरू

परळी : शहरात पावसाला सुरुवात होण्यापूर्वी जोरदार वादळ सुटल्याने अनेक भागात वीजपुरवठा रात्री ९:३० वा. दरम्यान खंडित झाला. परंतु उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही त्यामुळे संपूर्ण परळी शहर काळोखात बुडाले होते..

शहरातील अनेक भागात वीजपुरवठा नियमित करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागली. परंतु लाईटचा फॉल्ट हा डाबी येथील ३३ केव्ही ट्रान्सफॉर्मर मध्ये झाला असल्याचे लक्षात येताच वीजवितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी डाबी येथे वीज सुरळीत करण्यासाठी काम सुरु केले आहे परंतु काम करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ३ ते साडेतीन तासांचा अवधी लागणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान रविवारच्या रात्री पासूनच परळी शहर व परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आजही पावसाने सायंकाळी ७ वा.च्या दरम्यान पावसाने वादळवाऱ्यासह हजेरी लावली असता काही वेळातच लाईट गुल झाली असून युद्धपातळीवर काम सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *