टोकवाडी ग्राम पंचायत, आनंद हॉस्पिटल व जनलक्ष्मी हाॅस्पीटलचा आदर्श उपक्रम पहा व्हिडिओ सह…!

तीन दिवसात केले संपुर्ण गावची “थर्मल स्क्रीनिंग” तपासणी, दारोदार जाऊन अबालवृद्धांची तपासणी

डॉ. राजाराम मुंडे, डॉ. भारत मुंडे व डॉ. राम कांबळे यांचे मोलाचे योगदान

परळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी जनजागृती झाली आहे तर बर्‍याच ठिकाणी ग्राम पंचायत, विविध सेवाभावी संस्था कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तालुक्यातील टोकवाडी ग्राम पंचायतने असाच आदर्श उपक्रम राबविला आहे. परळीच्या आनंद हाॅस्पीटल आणि जनलक्ष्मी हाॅस्पीटल यांच्या सहकार्याने गावातील सर्व नागरीकांची “थर्मल स्क्रीनिंग” तपासणी केली आहे. यात कुणालाही कोरोनाची कसलीही लक्षणे दिसून आली नसल्याचे डॉ. राजाराम मुंडे यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक माणसाने, गावाने,, शहराने आपापल्या परीने संसर्ग प्रतिबंध करून जनजागृती करण्याची जबाबदारी पार पाडणे आता आवश्यक झाले आहे. त्यातच विविध सामाजिक उपक्रम राबवून टोकवाडी ग्राम पंचायतने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही ग्राम पंचायतने अनेक उपक्रम राबवून जनजागृती केली. गावातील प्रत्येक नागरिकाला निरोगी ठेवण्यासाठी डॉ. राजाराम मुंडे यांनी प्रयत्न केले आहेत. आताही गावात कुणीही आजारी पडू नये, आजारी असेल तर त्याच्यावर उपचार करता यावेत म्हणून डॉ. राजाराम मुंडे यांनी परळीच्या आनंद आणि जनलक्ष्मी हाॅस्पीटलच्या सहकार्याने संपुर्ण गावातील प्रत्येक नागरीकांची “थर्मल स्क्रीनिंग” तपासणी केली आहे.
डॉ. राजाराम मुंडे, डॉ. भारत मुंडे आणि डॉ. राम कांबळे यांनी तपासणी केली तर अनिल मुंडे, श्रीधर बापू भांगे, विश्वनाथ मुंडे, अंतराम मुंडे यांनी तपासणीकामी सहकार्य केले. तब्बल तीन दिवस गावातील प्रत्येक घरी जाऊन, घरातील प्रत्येकाची तपासणी केली. या तपासणीत कुणालाही कसलाही आजार दिसुन आला नसल्याचे डॉ. राजाराम मुंडे यांनी सांगितले. सलग तीन दिवस या सर्व डाॅक्टरांनी गावातील प्रत्येक नागरीकांची तपासणी करून सर्वांना मोठा दिलासा दिला आहे. या सर्व कार्यात परळी पंचायत समितीचे उपसभापती बालाजी (पिंटु) मुंडे, सरपंच सौ. गोदावरी मुंडे, उपसरपंच सौ. मंदाकिनी काळे, ग्रामसेवक अशोक नागरगोजे, ग्राम पंचायतचे सर्व सदस्य, माऊली मुंडे गुरूजी आदींनी सहकार्य केले. टोकवाडी ग्राम पंचायतने केलेल्या या तपासणीतचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *