टेंभुर्णीसह परिसरातील खेड्या- पाड्यात बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री
टेंभुर्णी (प्रतिनिधी)- कोरोना व्हायरसनं देशात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरेानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. लॉकडाऊन 3.0 चा आजचा शेवटचा दिवस आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटांत असतांना अतिशय गौरवशाली कार्य तथा उत्तम सेवा देणारे पोलीसांची नजर चुकवून दुसरीकडे मात्र चोरटी वाहतूक करत टेम्भुर्णीसह परिसरातील खेड्यात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव राजा तालुक्यातील देवळगाव माहीच्या (चांडोल) मधून बेकायदेशीररित्या चोरट्यां मार्गांनी दिवसा- रात्रीच्या वर्दळीच्या गैरफायदा घेऊन दोन चाकी व चार चाकी वाहनातून देशी व विदेशी दारूची विक्री केली जात आहे . आज रोजी प्रत्येक नागरिकांचीही जबाबदारी आहे की त्याने मद्यपान न करता स्वतःचा जीव व कुटुंबाचा जीव संभाळणे महत्त्वाचे असताना जिवाची पर्वा न करता तळीराम मात्र बिनधास्त आपलं जीवन जगत असताना चित्र दिसत आहे . आश्चर्य वाटते की शासनाने परवाना असणाऱ्या दुकान मालकांना कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामाजिक अंतर सोबतच सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत मर्यादा असताना सुद्धा परिसरातील काही दारूच्या दुकानातुन कायद्याच पालन केल्या जात नाही . शिवाय कायदा, नियमांचे उल्लंघन होत आहे . परिसरातील काही दारू दुकानात बिनधास्तपणे रात्र- बे -रात्र तळीरामाना दारू मूळ रक्कमेचा दीडपट महागळी बेकायदेशीररित्या मद्य विक्री केली जात आहे . लॉकडाउनच्या काळात कायद्याच्या गैरवापर करीत घर पोच मद्यपानाची सुविधा असतांना तळीरामाना दीडपट किंमत मोजावी लागत आहे .पैशाची लूट बेकायदेशीरपने गैरवापर करणाऱ्या दुकान मालकांला पकडुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.