ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांना पंकजाताई मुंडे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले

बीड (प्रतिनिधी) – ज्येष्ठ विधिज्ञ व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी सदस्य ॲड. भास्करराव आव्हाड यांना पंकजाताई मुंडे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. एक शांत, संयमी, अभ्यासू व परिवारातील ज्येष्ठ सदस्याला आपण मुकलो आहोत अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
ॲड. भास्करराव आव्हाड यांचे आज पुणे येथे दुःखद निधन झाले. निधनाची बातमी समजताच पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे सुपूत्र अविनाश आव्हाड यांना संपर्क साधून तीव्र दुःख व्यक्त केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि आव्हाड यांचा कौटुंबिक स्नेह तर होताच शिवाय ते त्यांचे गुरू आणि नातेवाईकही होते. मी त्यांना माझ्या बालपणापासून पहात आले आहे. एक शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. आमचा परिवार त्यांच्या दुःखात मनापासून सहभागी आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *