जुगार अड्यावर धाड; १७ जुगारी घेतले ताब्यात!!

बीड : सध्या जुगार अड्यावर पोलीसांनी धाड सत्र सुरू केले असून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर पोलीस लक्ष ठेवून आहे. वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे तिर्रट नावाचा जुगार खेळवला जात असल्याची माहिती स्थानीक गुन्हा शाखेला मिळताच या ठिकाणी सपोनी विजय गोसावी यांनी धाड टाकली असता.१७ आरोपीसह ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई काल ५ वाजता करण्यात आली. 
पोलीसांनी दिलेल्या माहिती नूसार वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे काही जुगारी तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेला मिळताच पोलीसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता यामध्ये उमेश भाऊराव पांडव यांचे मोकळ्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगारी सुग्रीव शेषेराव घोलप, अप्पासाहेब गोवींद वाघमारे, दिलीप सुदाम घोलप, शेख युसूफ उर्फ कालू शेख वजीर, मोतीराम रामभाऊ शिंगारे, मिथून मरिदास शिंगारे, प्रल्हाद संदीपान घोलप, नितेश भाऊराव पांडव, उमेश भाऊराव पांडव, अर्जुन उत्तमराव घुगे,सदाशिव संभाजी गलांडे, विभीषण बाबूराव घुगे सर्व रा.चिंचवण ता.वडवणी, सर्जेराव गणपत राठोड, भीमराव बाबूराव काकडे दोन्ही रा. हरीशचंद्रप्रिंपी ता.वडवणी, अरुण उत्तमराव सोनार, रा.पिंपळखेड ता.वडवणी असे सर्व तिर्रट नावाचा जुगार खेळत असतांना मिळून आले. यामध्ये जुगारी १ ते १७ यांच्याकडून ८५ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहीत्य जप्त करण्यात आले. त्यांच्या विरुध्द वडवणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६८,२०२० कलम १८८,२६९, २७०,भादवी सह कलम ५१ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे सह कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, डिवायएसपी श्रीकांत डिसले, पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विजय गोसावी यांच्यासह विष्णु रोकडे, तुळशीराम जगताप, नरेंद्र बांगर, संतोष म्हेत्रे, सखाराम पवार, चालक अविनाश घुंगरड यांनी केली.

113 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *