जि. प. गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते परळी तालुक्यातील १८२ आशा वर्कर्सना फेस शिल्ड किटचे वाटप…!
परळी : तालुक्यातील आरोग्य सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविकांना कोरोनाच्या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे हस्ते वाटप करण्यात आले.
शहरातील गणेशपार भागातील नागरी आरोग्य सेवा केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे, पंचायत समितीचे उपसभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, उपसरपंच हनुमंत कांबळे, बापू नागरगोजे आदी उपस्थित होते.
तालुक्यातील १८२ आशा स्वयंसेविकांना फेस शिल्ड किटचे वाटप करण्यात आले. उर्वरित २४ आशा स्वयंसेविकांना नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने गटनेते अजय मुंडे यांना फेस शिल्ड किट देण्याचा शब्द दिला व आपण आरोग्य सेवा देणाऱ्या गावपातळीवरील व्यक्तीला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन श्री. मुंडे यांनी दिले.