जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी अथवा येण्यासाठी परवाना देण्याच्या प्रणालीत पुन्हा बदल…!
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी अथवा येण्यासाठी परवाना देण्याच्या प्रणालीत पुन्हा बदल
▪️ http://covid19.mhpolice.in हे संकेतस्थळ वापरण्याचे आदेश
बीड : बीड जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी आणि बीड जिल्ह्यात येण्यासाठी परवाना (पास) देण्याच्या प्रणालीत पुन्हा एकदा बदल करण्यात आला असल्याचे बीड जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (८ मे) सांगितले आहे.
यापूर्वी बीड जिल्ह्यात स्थानांतरणासाठी http://beed.gov.in या संकेतस्थळावरून परवाना देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे या संकेतस्थळाहून परवाना देणे बंद करण्यात आले आहे.
त्यामुळे यापुढे बीड जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी आणि बीड जिल्ह्यात येण्यासाठी http://covid19.mhpolice.in या संकेतस्थळाचा वापर करावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (८ मे) दिलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
तसेच, http://beed.gov.in या संकेतस्थळावरून परवाना देण्याची प्रणाली बंद करण्यात आली आहे. मात्र, या संकेतस्थळामार्फत यापूर्वी देण्यात आलेले सर्व पासेस वैध राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.