जिल्ह्यात ३६ हजार ३६३ कापुस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी
परभणी : शासकीय कापूस खरेदी केंद्र व कृषि उत्पन्न बाजार समिती कडे शेतमाल विक्री करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना एक ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन देण्यात आली होती दि. १८ एप्रिल २०२० रोजी कार्यान्वीत करण्यात आलेल्या या प्रणालीला परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३६ हजार ३६३ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. आपला कापूस विक्रीसाठी घेऊन जाताना आणि विक्री प्रक्रियेत सहभागी होतांना सर्व शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्स व इतर मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे . सीसीआय व कॉटन फेडरेशन यांना शेतकऱ्याकडील एफ ए क्यू दर्जाचा कापूस खरेदी करणे बाबत सूचित केले आहे . त्यानुसार जिल्ह्यातील परभणी तालुका – ५६०३ , गंगाखेड – ६६०१ , जिंतूर – २१०९ , पाथरी ३९ . २ . पाल्म – १६२३ . पूर्णा – ७०१ , मानवत – ५४०० , सेलू – ४२९३ व सोनपेठ – ३०४४ अशी तालुका निहाय आकडेवारी असून एकूण ३६ हजार ३६३ शेतकऱ्यानी या लिंकवर आपला कापूस विक्री करणेसाठी नोंदणी केलेली आहे. ही नोंदणी https://forms.gleNUASetva7aDakGn3A या लिंकद्वारे करण्यात आली आहे . त्याच बरोबर परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून https://parbhani.gov.in/ सुद्धा ही नोंदणी करता येत आहे . या संगणकीकृत सुविधेमुळे सर्व शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांच्या नावाची नोंदणी करता येते तसेच शेतकरी बांधव त्यांचेकडील भ्रमणध्वनीवरुन देखील नोंदणी करु शकत आहेत. या प्रणालीमुळे शेतकऱ्याची बाजार समितीमध्ये टोकन घेण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले असून केद्र शासन व राज्य शासनाने कोवीड – 19 या विषाणूचा संसर्ग न होण्यासाठी ज्या मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत त्यानुसार सोशल डिस्टन्सचे पालन होण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत होऊन कोविड – 19 या विषाणूच्या संक्रमण होण्यास प्रतिबंध झालेला आहे. ही लिंक दि. २७ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणीसाठी चालु असणार आहे . त्यानंतर ही लिक बंद होवून याद्वारे संकलीत झालेला सर्व डाटाची जिल्ह्यातील ए . पी . एम . सी . निहाय वर्गवारी करण्यात येणार आहे. प्रत्येक नोंदणीचा दिनांक आणि वेळ संगणकात साठवून ठेवलेला असल्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिनांक निहाय व नोंदणी केलेल्या क्रमाने त्यांचा कापूस विक्री करण्यासाठी लवकरच जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती यांचेमार्फत एसएमएस किंवा भ्रमणध्वनी वरुन कळविण्यात येणार आहे . त्यानुसार संबंधीत शेतकर्याने आपला कापूस विक्रीसाठी घेऊन जावयाचा आहे. केंद्रीय कपास निगम लि . ( CCI ) , महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांचेकडे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमाल विक्री करणेसाठी अनुप कुमार प्रधान सचिव ( पणन ) मंत्रालय मुंबई , दी . म . मुगळीकर , जिल्हाधिकारी , परभणी , सुनिल पवार , पणन संचालक , महाराष्ट्र राज्य , पुणे , योगीराज सुर्वे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था , औरंगाबाद , मंगेश सुरवसे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था , परभणी , श्री . रेणके , प्रभारी विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ म . विभागीय कार्यालय परभणी आणि परभणी जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याच्या कापसाची विक्री होणेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे . शेतकऱ्यांना त्यांचा कापूस विक्रीची ऑनलाईन नोंदणी करणेसाठी संगणीकृत प्रणाली कार्यान्वीत करणेसाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ( NIC ) परभणीचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर व निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.