जिल्ह्यात मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन जैववैद्यकीय घनकच-याची विल्हेवाट लावण्याची सूचना – जिल्हाधिकारी

बीड : जिल्हयातील सर्व खाजगी तसेच शासकीय, निमशासकीय संस्था पॅथलॅब, आयुर्वेद, युनानी होमीयोपॅथीक, अॅलोपॅथी, दंत इत्यादी रुग्णसेवेतून आंतर व बाहयरुग्ण विभागातून निर्माण होणारा जैववैद्यकीय घनकच-याची विल्हेवाट जैव वैद्यकीय (व्यवस्थापन व हाताळणी) कचरा नियम, २०१६ प्रमाणे करणे आवश्यक असून बीड जिल्हयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेली संस्था कार्यरत आहे. सदर संस्था केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करुन जैव वैद्यकीय कच-याचे वैज्ञानिक पदधतीने जैव वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावते. वरील
सर्व वैद्यकिय संस्थानी या संस्थेमार्फत किंवा इतर विहित पध्दतीने जैव वैद्यकिय कच-याची विल्हेवाट
लावण्याची संपूर्ण व्यवस्था करावी यासाठी अंतिम 15 दिवसांची मुदत देण्यात येत आहे. यानंतर याप्रमाणे उपाययोजना न केल्यास आपणाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *