जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी… शेतकऱ्याच्या पिकावर संक्रांत…
नंदुरबार(प्रतिनिधी)
कालपासून जिल्ह्यात वातावरणात बदल झाल्यामुळे व सर्वत्र ढगाळ झाले होते. अवकाळी पावसाच्या सरी सकाळपासून सुरू आहेत. त्यात शेतकऱ्यांच्या पिकावर मात्र संक्रांत आली आहे. यात ज्वारी,गहू ई. पिकाच नुकसान होईल.
वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. यात तळोदा तालुक्यातील खरवड, बोरद,मोड परिसरात सकाळ पासून अवकाळी सरी कोसळत आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत पडले आहेत.
