जिल्हा रुग्णालयाची ओ.पी.डी. पुर्वीच्या जागेवर स्थलांतर करा नसता आंदोलन करु ; सलीम अध्यक्ष!
बीड : देशात संसर्ग वाढल्याचे आणि जिल्हात कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाने ने सरकारी दवाखान्यातील सर्व वार्ड आदित्य कॉलेज येथील इमारती मध्ये स्थलांतर केले होते, आणि पुर्ण जिल्हा रुग्णालयाला कोरोना सेंटर केलेले आहे. आज कोरोना ची टक्केवारी अतिशय कमी झालेली आहे, आता आदित्यतील सर्व सुविधा जिल्हा रुग्णालयात आणावी कारण हार्ट अटैक, एक्सीडेंट, प्रसुती (डिलीवरी) व इतर ऑपरेशन्स पेश्ंटसला शहरातून पाच किलो मीटर वर प्रवास करुन आदितय कॉलेज पर्यंत जावे लागते, रस्ते खराब असल्याने पेशंटला खुप त्रास होतो म्हणून आदित्य मधिल ओ.पी.डी. जिल्हा रुग्णालयात आणण्यात यावे अशी मागणी आने नागरीकांनी लेखी स्वरुपात प्रशासनाकडे केलेली आहे, पण या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, म्हणून आता लोकशाही मार्गाने जिल्हा प्रशासनाला आमचं हे शेवटचे पत्राद्वारे निवेदन आहे, की येत्या 15 ते 20 दिवसात आ.पी.डी. जिल्हा रुग्णालयात स्थलांतर करा नसता मा.जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरना आंदोलन करण्यात येईल अशा इशारा समाजसेवक सलिम अध्यक्ष, रईस चाऊस, अजीम बाबा, बिलाल भाई, ए.एस.गोलू, वसीम लाला, फैसल चाऊस, वाजेद भाई,. आदींनी केला आहे