जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नाहोली चे मुख्याध्यापक खरात आर. जी सेवानिवृत्त
नेकनूर : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नाहोली ता. केज येथील मुख्याध्यापक खरात आर. जी हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या कारणाने त्यांचा सेवापूर्ती चा सोहळा संपन्न झाला सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गावच्या सरपंच मिनाताई बिक्कड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून केज तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय केंद्रे साहेब नांदुरघाटचे मु.अ डोईफोडे सर, शिरूर घाटचे मु.अ तारळकर सर ,केदार सर, जाधव सर , ढाकणे सर , रोकडे सर , बहीर सर , इनामदार साहेब मोहम्मद साहेब दिलीप बिक्कड सर , ग्रामपंचायत सदस्य रविंद्र बिक्कड जयद्रथ झाडे सर्व शिक्षक बंधु भगिनीं प्रतिष्ठित प्रतिष्ठित नागरीक शिक्षण प्रेमी उपस्थित होते जिल्हा परिषद शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कर्तव्य दक्ष कामगिरी करणारे मुख्याध्यापक म्हणून खरात सरांचे मान्यवरांनी कौतुक केले त्याचे पुढील आयुष्य निरोगी सुख समृद्धी चे जावो अशा सर्वांनी शुभेच्छा दिल्या व अल्पोपहार ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.