जिल्हाधिकारी राहुल रेखावार स्वत: होम क्वारंटाईन!!
बीड : पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार स्वतः होम क्वारंटाईन झाले असल्याचे समजते
अंबाजोगाई येथील कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे स्वतःहून अनेकजण होम क्वारंटाईन झाले आहेत
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिनांक ८ जून रोजी अंबाजोगाई येथील कोरोणा चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले होते यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह काही लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा कोरोणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार स्वतः होऊन होम क्वारंटाईन झाले आहेत या बरोबर त्यांनी प्रशासनातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील सेल्फ क्वारंटाईन होण्याची सूचना दिल्या आहेत.