जिल्हयात महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवावी ; जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड : मग्रारोहयो योजना ही ग्रामीण भागाचा कायमचा कायापालट करणारी महत्वाकांक्षी योजना आहे. जिल्हयात ग्रामपंचयातीच्या लेबर बजेट व कृती आराखडा सन 2021-22 तयार करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. जिल्हयातील सर्व ग्रामीण भागातील नागरिकांनी आपआपल्या गावची शिवार फेरी करून माथा ते पायथा पाणलोट विकासांचा तसेच वैयक्तिक लाभाच्या कामांचा समावेश कृती आराखडयात करून घ्यावा. तसेच कृती आराखडा मंजुरीसाठी पंचायत समिती कार्यालयास सादर करावा.असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.
मग्रारोहयो योजनेत अकुशल रोजगाराची पुर्तता दिर्घकालीन टिकणारी कामे व त्याव्दारे सामाजिक पायाभूत सोयी उपलब्ध करून देऊन ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावेल व कायमस्वरूपी मालमत्ता तयार करणे हे योजनेचे प्रमुख उदिष्ट आहे.
यामध्ये लाभाची कामे वैयक्तिक जलसिंचन विहीर, रेशीम उद्योग (तुती लागवड व किटक संगोपण गृह तयार करणे),शेततळे, शोषखड्डे ,घरकुल,नाडेप खत निर्मिती, वैयक्तिक शौचालय,शेळी पालन शेड,कुकूट पालन शेड ,गाय गोठे,विहीर पुर्नभरण, शेत बांध बंधिस्ती, फळबाग लागवड, बांधावर वृक्ष लागवड,संजिवक किंवा अमृत पाण्यासाठी खड्डा घेता येतात.
तसेच सार्वजनिक कामे सार्वजनिक जलसिंचन विहिर,गाव तलाव,रोपवाटीका ,पाणंद रस्ता,रस्ता दुर्तफा वृक्ष लागवड,समपातळी चर,गॅबीयन बंधारा,मातीनाला बांध,दगडी बांध, एलबीएस,कंटुर बांध,क्रिडागंण, स्माशन भूमी,सार्वजनिक शौचालय,नाला रुंदीकरण,माती बंधाऱ्याचे पुर्नजिवन,पाझर तलाव, गाळ काढणे ही कामे आहेत.
अभिसरणातील कामे शाळेसाठी खेळाचे मैदान /संरक्षक भिंत बांधकाम,छतावह बाजार ओटा,शालेय स्वयंपाकगृह निवारा,नाला-मोरी बांधकाम, सार्वजनिक जागेवरील गोदाम,सिमेंट रस्ता,पेव्हींग ब्लॉक रस्ते,डांबर रस्ता,शाळेकरीता / खेळाच्या मैदानाकरीता साखळी कुंपण, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन,सामुहिक मत्सतळे ,सार्वजनिक जागेवरील शेततळे,काँक्रीट नाला बांधकाम,आ.सी.सी.मुख्य निचरा प्रणली,भुमिगत बंधारा,सिंमेट नाला बांध,कॉम्पोझिट गॅबियन बंधारा ,बचत गटाच्या जनावरांसाठी सामुहिक गोटे, स्मशानभूमी शेड बांधकाम,अभिसराणातील इतर योजनेतील निधी सोबत मजुरी आणि साहित्य खरदेसाठी नरेगाचा निधी जोडून देता येतो आणि अशाप्रकारे इतर योजनेतील निधी वाचवता येतो. नियमानुसार यंत्र सामुग्री वापर करता येते.
या योजनेची ठळक वैशिष्टे नुसार ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास किमान 100 दिवस रोजगाराची हमी, ज्या कुटुंबाकडे जॉब कार्ड नसतील त्यांनी ग्रामपंचयातीस संपर्क करावा,कामाची मागणी करणारा अर्ज आपल्या ग्रामपंचातीकडे करा,मागणी केल्यानंतर 15 दिवसात काम उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचयातीची राहील.