जालन्यात कोरोना पॉझिटिव्हच्या संख्येत झपाट्याने वाढ;आकडा 110 वर

जालना (प्रतिनिधी) – जालन्यात कोरोना पॉझिटिव्हच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आज गुरुवार रोजी एकुण 24 रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्यामुळे जालना जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 110 वर पोहचला.जालन्यात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा खडबडून जागे झाले आहे. या 24 जणांमध्ये अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव येथील सहा जनांचा समावेश असून अंबड येथील शारदा नगर मधील 5, बदनापूर तालुक्यातील काटखेडा 5, बदनापूर 1, राज्य राखीव दलातील 1 जवान, आणि कोविड केअर सेंटरमधील 6  जणांचा समावेश आहे. अंबड येथील शारदा नगर मधील 5 रुग्ण हे नुकतेच घाटकोपर मुंबई येथून परतले असून कोविड केअर सेंटरमधील 6 जण आणि इतर 12 असे 18 रुग्ण हे कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *