जालन्यात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने; एकूण आकडा 72 वर पोहोचला
जालना (प्रतिनिधी) – मंठा तालुक्यातील एका 70 वर्षीय महिलेचा अहवाल आज सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोना बाधित रूग्णांची संख्या 72 वर पोहचली असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. मंठा तालुक्यातील हनुमंतखेडा येथील रहिवाशी असलेली सदर महिला काही दिवसांपूर्वी जालना येथील अंबड चौफुलीजवल असलेल्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती.सदर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्रास जाणवल्या ने या महिलेला दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आणि सदर महिलेच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज सोमवारी सकाळी सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याने अंबड चौफुलीजवल असलेल्या खाजगी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून या सर्वांना कॉरन टाईन करण्यात आले आहे.