जालना शहरात कोरोनाचा कहर, 42 पैकी 40 रुग्ण जालन्यातील
चार शतक पूर्ण पाचव्या शतकाकडे आगेकूच;नागरीकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन
जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील आणखी 38 संशयीत रुग्णांचे अहवाल आज रविवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 504 इतकी झाली आहे. जालनात कोरोनाच्या रूग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढत होत असून चार शतक पूर्ण करीत पाचव्या शतकाकडे आगेकूच केली आहे. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 317 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. जिल्हा रुग्णालयाने काल शनिवारी 110 संशयीत व्यक्तींच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी केवळ 22 अहवाल आज रविवारी सकाळी प्राप्त झाले आहेत. त्यात चार पॉझिटिव्ह आणि 18 निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या मध्ये जालना शहरातील जुना जालना भागातील संजोगनगर,नवीन जालन्यातील नलगल्ली, पानशेद्रा ता.जालना,भारज बु. ता जाफराबाद येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.आणखी 38 नवीन संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक 15 रुग्ण रहेमान गंज भागातील असून दानाबाजार भागातील 10,खडकपुरा भागातील 5,मंगलबाजार 2,यशोदानगर,क्रांतीनगर, जालना नगर परिषद कार्यालय शेजारी,सुरज अपार्टमेंट, आणि राजश्री शाहूनगर या भागातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.जालना शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत सरकारी सुत्रांनी व्यक्त केले आहे.