जागृती ना.सह.पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सभासदांना सर्व कर्जावरील व्याजदरात कपात- प्रा.गंगाधर शेळके

परळी : जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पतसंस्थेच्या सभासदांना सर्व कर्जावरील व्याजदारात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जागृती पतसंस्थेेचे मार्गदर्शक तथा चेअरमन प्रा.गंगाधर शेळके सर यांनी दिली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व सभासद, ठेवीदार यांनी जागृती पतसंस्थेच्या वाटचालीत मोठे योगदान आहे अशी माहिती संस्थेचे मार्गदर्शक गंगाधर शेळके सर यांनी कळविले आहे.या संस्थेची सुरूवात 12/05/1989 रोजी जागृती महिला नागरी सहकारी पतसंस्था या नावाने सुरवात केली होती .पण महिला पतसंस्था चालवण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे 1995 ला महिला नागरी याचे  जागृती नागरी सहकारी पतसंस्था म. परळी वैजनाथ  या नावाने सुरूवात करण्यात आली .यानंतर 1997 ला जागृतीच्या अंबाजोगाई आणि सिरसाळा येथे शाखा उघडयात आल्या.ठेवीदार आणि सभासद यांच्यामुळे आज बीड जिल्ह्यात नावारूपाला आली. त्यामुळे 2011 ला जागृती मल्टिस्टेट परळी-वै . या नावाने स्थापना करण्यात आली .आज औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी  या जिल्ह्यात 16 शाखा कार्यरत आहेत तसेच कर्नाटक मध्ये भालकी या ठिकाणी पण सोसायटी ची शाखा कार्यरत असुन सर्व शाखा संगणकीय आसुन.दर वर्षी सभासदांना 13% लाभांश दिला जातो,सर्व प्रकारचे कर्ज वाटप केले.सोने तारण कर्ज,पगार तारण कर्ज,माल तारण कर्ज,नजर गहाण कर्ज,दोन जामीन वर कर्ज,वितरीत करण्यात येत आहे.पतसंस्थेची स्वताची तिन मजली इमारत आहे. सभासद साठी नाममात्र भाडे तत्त्वावर लॉकर सुविधा सुरु करण्यात आली आहे. संस्थेस आँडीट वर्ग अ आहे.जागृती पतसंस्था व जागृती मल्टिस्टेट वार्षिक उलाठाल 350 कोटींच्या वर आहे. संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यात पण नेहमी अग्रेसर राहिली आहे. सभासदांच्या पाल्यांना आर्थिक मदत, गणवेश वाटप, केरळ पुरग्रस्तांना मदत, उन्हाळ्यात संस्थेच्या वतीने पाणी पुरवठा करण्यात येतो. कोरोना संक्रमण झाल्यामुळे जागृती ग्रुपच्या वतीने शिधावाटप करण्यात आले आहे.तसेच कोरोना विषाणू संक्रमण असल्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यात आली आहे . आज संस्था हि सभासद ,ठेवीदार, संचालक मंडळ, कर्मचारी, आदी मुळे संस्था नाव रूपास आली आहे.आज 31 व्या वर्धापन निमित्त सर्व कर्जावरील व्याज दरात कपात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *