जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंनी हातावर बांधलं शिवबंधन शिवसेना कष्टकरी शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष – शंकरराव गडाख
प्रतिनिधी:-सुरज आबाचने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री व उस्मानाबाद जिल्हा चे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. शिवसेनेकडून ट्विट करत शंकरराव गडाख यांच्या पक्षप्रवेशाची माहिती देण्यात आली. तसंच शंकरराव गडाख यांनीदेखील ट्विट केलं आहे. “शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या प्रति असलेल्या निष्ठा व विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करून यापुढे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतूत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव व गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील,” असं त्यांनी म्हटलं आहे. आज शिवसेना पक्ष प्रमुख, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून शिवसेना पक्ष प्रवेश केला यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यापुढे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतूत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव व गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील.