जया बच्चन यांच्यासह ऐश्वर्या, आराध्याचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह
मुंबई: मुंबईसह राज्यात थैमान घालणाऱ्या करोना ससंर्गाने अमिताभ बच्चन यांच्या घरात शिरकाव केल्यानंतर सारेच हादरले आहेत. अमिताभ यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पाठोपाठ पुत्र अभिषेकलाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने काळजी वाढली. मात्र, त्यानंतर काहीसा दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.