“जनतेसाठी सदैव तत्पर”-राजेभाऊ फड कन्हेरवाडी गावातील “सात ” मुलीच्या लग्नासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत…

परळी ( प्रतिनिधी ): कन्हेरवाडी चे सरपंच तसेच रासपा चे युवा प्रदेशाध्यक्ष श्री राजेभाऊ फड यांच्या वतीने गावातील “सात” मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देऊन ही सेवा अखंडित सुरू ठेवण्यात आली . दी.31 जुलै 2020 रोजी कन्हेरवाडी गावातील आत्माराम भगवान फड , वचिष्ट तुकाराम पांचाळ, एकनाथ तुकाराम पांचाळ, सखाराम गंगाराम फड, प्रल्हाद जनार्दन रोडे, बालासाहेब भानुदास मुंडे, वसंत रघुनाथ पवार, यांच्या मुलीच्या लग्नासाठी प्रत्येकी घोषणा केल्या प्रमाणे गावचे सरपंच श्री राजेभाऊ फड वतीने ही रक्कम देण्यात आली या वेळी सरपंच श्री राजेभाऊ फड , सहकारी सोसायटी चेअरमन श्रीरामजी मुंडे सहकारी सोसायटी व्हॉ. चेअरमन नाथराव फड, स.सो.सदस्य गुंडीबा फड, नामदेव खांडे, मिनीनाथ फड , सोपानराव पांचाळ, हनुमंत पांचाळ, महादेव मामा मुंडे, दिनकर फड, बालासाहेब पांचाळ, मधुकर मुंडे( टेलर), नागनाथ आप्पा , बबन मंदे, सुनील फड, नंदकिशोर पांचाळ, जीवन पांचाळ, राजू फड, यांच्या सह इतर नागरिक उपस्थित होते

110 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *