जनता कर्फ्यू हे आवाहन; आदेश नाही !- जिल्हाधिकारी ▪️गोविंद यादव यांनी केली होती मागणी ▪️
गंगाखेड : ऊद्या दिनांक २६ सप्टेंबर पासून जनता कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे. यातून गंगाखेड शहर वगळण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केली होती. हा जनता कर्फ्यू गंगाखेडकरांसाठी ऐच्छीक असून तो पाळावा असे आदेश नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ दीपक मुगळीकर यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे या पाच दिवसीय बंद मधून दिलासा मिळाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दिनांक २६ सप्टेंबर पासून जिल्हाधिकाऱ्यांनी पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. मागील आठवड्यात १७ ते २० सप्टेंबर व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळल्यामुळे या जनता कर्फ्यूतून गंगाखेडकरांना सुट देण्याची मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. तीस प्रतीसाद देतांना जिल्हाधिकाऱ्यानी हा जनता कर्फ्यू बंधनकारक नसून ऐच्छीक असल्याचे स्पष्ट केले आहे. वाढत्या कोरोनास प्रतीबंध करण्यासाठी हा जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. आपल्या मागणीस सकारात्मक प्रतीसाद दिल्याबद्दल गोविंद यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. अकारण घराबाहेर न पडता व्यापारी, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.