चौधरीनगर येथे आरोग्य पथकाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण

जालना (प्रतिनिधी) ः देवमुर्ती (ता. जालना) अंतर्गत चौधरीनगर येथे (ता. 1 मे) रोजी एक जवान कोरोना पॉझीटीव्ह आढळुन आला होता. त्यामुळे या परीसरातील नागरीकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. शनिवार (ता.2) पासून याच पार्श्‍वभुमीवर विशेष खबरदारी बाळगत चौधरीनगर येथे पिरपिंपळगांव पीएचसी अंतर्गत आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले. यावेळी त्यांनी चौधरीनगर येथे घरोघरी जाऊन नागरिकांना घाबरून न जाता विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.
शनिवार (ता.2) रोजी चौधरीनगर येथील जवान हा मालेगांव येथुन (ता.16 एप्रिल) रोजी जालन्यात परतला होता. मालेगांव येथील जालन्याच्या तुकडीतील 23 जवान पॉझीटीव्ह आढळुन आल्याने चौधरीनगर येथील जवानाने स्वतःहुन खबरदारी घेत जिल्हा सामान्य रूग्णालायात तपासणी करून घेतली. त्याच्या स्वॅबचे नमुने पॉझीटीव्ह आल्याने प्रशासनाची मोठी धांदल उडाली. यामध्ये जिल्हा प्रशासनाने कुठेही हयगय न करता वैद्यकीय अधिकारी डॉ. मिर्झा बेग यांनी तात्काळ पिरपिंपळगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांची तातडीची बैठक घेऊन चौधरीनगर येथे 703 घरांचेे सर्वेक्षण करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुुुचना दिल्या. त्यानूसार टिम प्रमुख डॉ. मिर्झा बेग यांच्या नियंत्रणाखाली 16 टिम मधील सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका युध्दपातळीवर कामाला लागले असुन शनिवार ता. 2 पासून त्यांनी घराघरात  जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्याचे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली असुन आतापर्यंत 716 कुटुंबातील 3017 नागरिकांचे सर्वेक्षण केले असून यापुढे 14 दिवस सर्वेक्षण सुरू राहणार असल्याची माहीती डॉ. मिर्झा बेग यांनी दिली.  
या मोहिमेत सहभागी पिरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. मिर्झा बेग, आरोग्य सहाय्यक सुभाष मगरे, आरोग्य सेवक डिगाबर इंगळे, आरोग्य सेविका स्वाती माकोडे, ग्रामसेवक पी. बी. पवार, आशा गट प्रवर्तक दीपा रगडे यांच्यासह आशा सेविका संगीता पगडे, सुरेखा आचलखांब, नंदनी मिसाळ, अलका खरात, कौसरजॅहा पठाण, उषा सिंगने, भारती बारवकर, अलका वाघ, रेणुका गिराम, मंदाकिनी नागरे, संगीता दाभाडे, सुनिता जाधव, मारिया नाटेकर, संगीता जाधव, मुक्ता गव्हाणे, अंगणवाडी सेविका कावेरी इप्पर, वृंदा लोंढे, सुरेखा भानापुरे बबीता कासार, कल्पना ठाकूर, छाया बकाल, असराबाई अंबिलवादे, सरला काळे, कांता जाधव, मिना मस्के, मंजुषा सुरडकर, बिलकीस मुन्नीवाले, लता काकडे, शकीला शेख, सुनिता कोल्हे, निता भुतेकर, शारदा शेवाळे आदी कर्मचार्‍यांचा सहभाग आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *