घुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद
गंगापूर (प्रतिनिधी)- गंगापूर तालुक्यात सर्वत्र चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असतांना शुक्रवार ( दि. 29 मे ) रोजी गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील विलास संपत सुरासे (वय 49) यांनी शिल्लेगाव पोलिस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती की, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 60,500 रुपयाचं ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सदर गुन्ह्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व भेट देऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने स्तानीक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरून गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे माहिती मिळाली की सदर चा गुन्हा हा गंगापूर तालुक्यातील नवाबपूरवाडी येथील संदीप समाधान चव्हाण यानें त्याच्या साथीदारासह केलेला आहे. त्यांवरून नवाबपूरवाडी येथील 18 वर्षीय संदीप समाधान चव्हाण यास ताब्यात घेऊन विचार पूस केली असता. त्याने त्याच्या साथीदार सुरेश हरदास भोसले (वय 27) राहणार नावबापुरवाडी ह मु मुदेशवडगाव यांच्या सह केल्याची कबुली दिली . सदर टोळीकडून आणखी बरेच घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. सदर ची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश गावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्तानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस उप निरीक्षक भगतसिंग दूलत, संदीप सोळूंके, पोह रतन वारे, राजेंद्र जोशी, नवनाथ कोल्हे, पोना/ वाल्मीक निकम, ज्ञानेश्वोर मेटे, विनोद तांगडे, पोकॉ गणेश गांगवे, रामेश्वर धापसे, संजय तांदळे, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली आहे.