घरकुल लाभार्थ्यांनी अफवांना बळी पडू नये.

रिसोड . पंचायत समिती अंतर्गत घरकुल लाभार्थ्याचे काम विविध विषय व चर्चा अफवांमुळे ग्रामीण भागातील जनता याविषयी संभ्रमात आहे .या विषयावर गंभीर दखल घेत प. स. चे सभापती गीता हरिमकर, व तसेच उपसभापती सुभाष खरात, यांनी जनतेला अश्या प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. व तसेच या संबंधित कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण करू नये असे आव्हान रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना केलेले आहे. याविषयी जारी केलेल्या पत्रानुसार प.स. कार्यालय अंतर्गत रिसोड तालुक्यांमध्ये घरकुल विभागांतर्गत आवास प्लस सर्वेक्षण यापूर्वी पूर्ण करण्यात आले होते. ग्रामपंचायत वतीने निवड केलेल्या पत्र ड या अंतर्गत येणाऱ्या लाभार्थी सर्वेक्षण यापूर्वीच शासन निर्णयानुसार करण्यात आलेले आहे. तसेच सदर सर्वेक्षण लाभार्थी कुटुंबीयांचे कुटुंब प्रमुखाचे आधार सीडिंग व लिंक करण्यात आले होते. परंतु लाभार्थी कुटुंबातील इतर सदस्याचे आधार शेडिंग करण्यात आलेले नाही. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार रिसोड तालुक्यामध्ये 31 जुलै2020 पर्यंत कुटुंब सदस्य आधार सीडिंग करण्याकरिता मुदत देण्यात आली. परंतु ग्रामपंचायतीने संगणक परिचालक सदर कामावर बहिष्कार टाकल्यामुळे आधार सीडिंग चे काम पूर्ण होऊ शकले नाही. निदेश पाप्त होताच सदर काम पूर्ण करण्यात येणार आहे. तरी ग्रामीण भागातील जनतेने कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आव्हान हरिमकर व खरात यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *