गोरगरीब आणि सामान्य जनतेसाठी दररोज टँकरद्वारे पाणीपुरवठा – घुगे

जालना (प्रतिनिधी) – संकटात सापडलेल्या जनतेला या- त्या कारणाने मदत करणे, संकटात धावून जाण्याबरोबरच लॉकडाऊनच्या काळात देखील भाऊसाहेब घुगे यांनी गरजवंतांना किराणा सामानाच्या कीट वाटप केल्या आणि आता उन्हाळ्यात प्रत्येक दिवशी ते झोपडपट्टीधारकांसह गोरगरीब आणि सामान्य जनतेसाठी दररोज टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार आहेत. जनतेसेवेचा वसा कायमस्वरुपी स्मरणात ठेऊनच भाऊसाहेब घुगे यांचे कार्य सुरु आहे, असे गौरवोद्गार युवा सेनेचे विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी येथे बोलतांना काढले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यावतीने आज शनिवारी नवीन मोंढा परिसरातील झोपडपट्टी भागातील गोरगरीबांसाठी टँकरव्दारे पाणी पुरवठ्याचा शुभारंक करतांना श्री. खोतकर बोलत होते.  सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे झोपडपट्टी भागातील गोरगरीब जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हीच बाब लक्षात घेऊन श्री. भाऊसाहेब घुगे यांनी समाजसेवेच्या भावनेतून आता दररोज टँकरव्दारे घरपोच पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास   युवा सेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यासह तालुकाप्रमुख अजय कदम, गणेश घोडके, अमोल कारंजेकर, गौरव बुट्टे, संदीप जाधव, बाळाभाऊ वाघ, सुभाष पोपट  आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *