गेवराई शहरात वृद्ध पत्नीचा पतीकडून खून…!
वृद्ध पती कडूनच घडले कृत्य : उपअधीक्षक स्वप्निल राठोड घटनास्थळी दाखल; कारण अस्पष्ट..!
गेवराई : दगडाने ठेचून वृद्ध पत्नीचा खून केल्याची घटना गेवराई शहरातील वाणी मंगल कार्याल ढबय परिसरात आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार गंधराबाई बप्पासाहेब घुले वय, 65. असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे पतीसह त्या वाणी मंगल कार्यालय परिसरात राहत होत्या कौटुंबिक वादातून पती-पत्नीत वाद झाला त्यातूनच ही घटना घडल्याची माहिती
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे, महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड यांच्यासह इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते