गावठी दारूचे तीन अड्डे उध्वस्त
जालना (प्रतिनिधी)- जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील तीन हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर दारूबंदी पथकाने धाडी टाकल्या. या तीन अड्ड्यावरून 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तालुका जालना पोलीस ठाण्यात गावठी दारूचे अड्डे चालविणारे जगन संपत जाधव, मागं जगन जाधव आणि एक महिला, अशा तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोनि. राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी पथकाचे पोउपनि. संपत पवार, कर्मचारी धनाजी कावळे, सुभाष पवार, सुरेश राठोड, राजेंद्र वेलदोडे, सुरेश नलावडे, पवन नारीयलवाले, परमेश्वर धुमाळ, किशोर जाधव, आकाश कुरील, पुजा सोनकांबळे, रोहिणी पांचाळ, चालक धोडीराम मोरे यांनी ही कामगिरी केली आहे.