Newsबीड जिल्हा

गव्हाणे कौंडगाव येथील संशयित युवकाचा आला निगेटिव्ह रिपोर्ट..!

परळी :  परळी तालुक्यातील गव्हाणे कौंडगाव येथील एक युवक हा अस्वस्थ वाटू लागल्याने  अंबाजोगाई येथे विलगीकरन कक्षात भरती करण्यात आला होता. हा युवक माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व वांगी येथील अनेकांच्या संपर्कात आल्याने सोमवारी माजलगाव व परळी तालुक्यात खळबळ उडाली होती. सदर युवकाचा स्वॅब लातुर येथे तपासणी साठी पाठवण्यात आला असता अहवाल निगेटिव्ह आल्याने अनेकांचा जिव भांड्यात पडला. 
महिन्यापुर्वी पुणे येथे कामाला असलेला हा युवक साधारण विस दिवसापुर्वी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे दोन दिवस राहिला नंतर जालना जिल्हातील परतुर येथे काहि कामानिमित्त जाऊन परत दिंद्रुड मार्गेे माजलगाव तालुक्यातील वांगी व नंतर परळी तालुक्यातील जयगाव येथे काही दिवस राहिला होता. दरम्यान परळी तालुक्यातील कौडगाव येथे परत गेला असता अचानक तब्येत खराब झाल्याने त्यांने खाजगी दवाखान्यात उपचार घेतले परंतु परत त्याला अस्वस्थ वाटत असल्याने त्याला रविवारी सायंकाळी अंबाजोगाई येथिल विलगीकरण कक्षात भर्ती करण्यात आले असुन त्याचे स्वॅबचे नमुणे तपासणीसाठी लातुर येथील प्रयोगशाळेत पाठवले होते.सोमवारी सायंकाळी स्वॅब चा अहवाल निगेटिव्ह आला असुन माजलगाव व परळी तालुक्यातील अनेकांचा जिव भांड्यात पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *