गव्हाणे कौंडगावचा एक संशयीत विलगीकरण कक्षात; परळी तालुक्याच्या चिंतेतभर

परळी तालुक्यातील मौजे कौंडगाव येथील एक रहिवासी जयगाव येथे आपल्या पाहुण्याकडे वास्तव्यात आलेल्या एका संशयीताला अस्तव्यस्त वाटल्याने अंबाजोगाई येथे विलगीकरन कक्षात भर्ती करण्यात आल्याची माहिती परळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी दिली आहे. पुणे येथे कामाला असलेला हा व्यक्ती विस दिवसापुर्वी परतुर येथे आला होता परतुर येथुन तो पायी परळी तालुक्यातील कौडगाव येथे आला होता.दहा ते पंधरा दिवसापुर्वी जयगाव आपल्या नातेवाईकाकडे आला आणी परत तो कौडगावला गेला परंतु त्याची अचानक तब्बीयत खराब झाल्याने त्यांने खाजगी दवाखान्यात उपचार घेतले परंतु परत त्याला अस्तव्यस्त वाटत असल्याने त्याला रविवारी सायंकाळी अंबाजोगाई येथिल विलगीकरण कक्षात भर्ती करण्यात आले असुन त्याचे स्वाबचे नमुणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. दरम्यान जयगाव 12 तर कौडगावचे 6 जणांनाची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या हाताला शिक्के मारुन क्वारंटाईन करण्यात आले असुन कौडगाव व जयगाव येथे संशयीताच्या संपर्कात कोण आले आहेत त्याचा आरोग्य विभाग शोध घेतला जात आहे.आरोग्य विभागाने त्या दोन्हीही गावात पुर्णलक्ष केंद्रित केले असुन तेथील नागरिकांनी घराबाहेर पडु नये असे आवाहन परळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *