गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
अजिंठा।प्रतिनिधी मुजीब शेख
येथिल एका शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सोमवारी (दि.७) सकाळी उघसकीस आली.भास्कर साहेबराव चव्हाण (५०) रा.अजिंठा असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आपल्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सोमवारी उघसकीस आली आहे.या प्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात अकस्मात मूर्त्युची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास साह्ययक पोलिस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार अक्रम पठाण,पोलिस नाईक प्रविण बोदवडे करीत आहे.
