गळफास घेऊन शेतकऱ्यांची आत्महत्या
आमठाणा (प्रतिनिधी) – सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ( दि१३ )रोजी पंढरी धोंडीबा वाघ वय ४५ या शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी येऊन स्वतः गळाफास घेऊन आत्महत्या केली तत्काळ अजिंठा येथे तपासणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले .सततच्या कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळामुळे हा शेतकरी हवालदिल झाला होता.शरीराने विक असला तरीही हा शेतकरी छोटे-मोठे काम करून आपला परिवाराचा बोजा उचलत होता.शेतीत माल होत नसल्यामुळे शेतीसाठी घेतलेली उसनवारी घेतलेले पैसे कित्येक वर्षापासून फिटत नसल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकर्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगी आहे.