खोतकरांच्या प्रयत्नातून दुध उत्पादकांचे थकलेले वेतन मिळाले

दुध उत्पाकांनी मानले आभार

जालना (प्रतिनिधी) : कोरोना या संसंर्गजन्य विषाणूने संपुर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात थैमान घातल्यामुळे संपुर्ण देशामध्ये शासनाच्या वतीने लॉकडाऊन लागू करण्यात आले असल्याने छोट्या – मोठ्या उद्योगधंद्यावर याचा मोठा परिणाम होऊन संपुर्ण जनजीवन कोलमांडून गेले आहे. मा. राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नामुळे दुध उत्पादकांचे अडकलेले वेतन मिळाल्याने अर्जुनराव खोतकर यांचे सर्व दुध उत्पादकांकडून आभार व्यक्त करण्यात आले. आले.जालना शहरातील दुध उत्पाकांचे वेतन अडल्यामुळे दुध उत्पादक संतोष सुपारकर, संतोष परळकर यांनी ही बाब मा. राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर खोतकरांनी तात्काळ पाठपुरावा करून डि. डि. सी. कमीशनर पोयम, मुंबई यांच्याशी सतत पाठपुरावा करुन दुध डेअरीवाल्यांचे थकलेले पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी निवेदन दिले त्याच निवेदनाची दखल घेत दुध उत्पादकांचे अडकलेले पैसे त्यांना मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. लॉकडाऊन काळात दुध उत्पादकांचे अडकलेले पैसे मिळाल्यामुळे संतोष सुपारकर, संतोष परळकर व इतर दुध उत्पादकांनी मा. राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *