खा.डॉ . प्रितमताईनी केली अॅन्टीजन टेस्ट अहवाल निगेटिव्ह
परळी वैजनाथ दि ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्याच्या खासदार मुळतहा : व्यवसायाने डॉक्टर आहेत . त्यामुळे रुग्ण कोणताही असो त्यांच्यातली संवेदना जागृत असते . मुंबईहून शहरात येताच डॉ. प्रितम ताई गोपीनाथ मुंडेनी थेट कोविड रुग्णालय गाठले . रुग्णांच्या सोबत संवाद करून अस्थेवाईक पणे चौकशी करुन धास्तावलेल्या रुग्णांना मानसीक दिलासा दिला . दरम्यान विलगीकरण कक्षाला भेट देवून अरोग्य व्यवस्थेची पाहणी करत डॉक्टरांना काही सुचना पण केल्या . दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार डॉ. प्रीतम ताईनी स्वःताची अॅन्टीजिन टेस्ट अगोदर करून घेतली निगेटिव्ह आल्यानंतरच कामाला सुरुवात केली हे विशेष . परळी शहरात आल्या बरोबर खासदारांनी अगोदर डॉ . बाबासाहेब आंबेडकर कोविड वस्तीग्रह सेंटर , लोकनेते स्व .गोपीनाथराव जी मुंडे नटराज रंग मंदिर आदी ठिकाणी भेटी दिल्या . विलगी करण कक्षात जावून रुग्णांच्या सोबत प्रत्येक्ष संवाद साधला . शहरात मोठया प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत . त्या संदर्भात डॉक्टरांच्या सोबत चर्चा केली . काही महत्वाच्या सुचना पण त्यांनी केल्या . शहराचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया सोबत होते .कोविड रुग्णांच्या सोबत खासदार ताईनी संवाद करतांना आनेकाची चौकशी केली . घाबरू नका . उपचार घ्या . लवकर बरे व्हाल अस सांगीतल्या नंतर रुग्णांना दिलासा मिळाला . बीड जिल्ह्याला डॉक्टर खासदार असल्याचा फार मोठा फायदा मागच्या सहा वर्षात झालेला आहे .खासदार ताईनी जिल्ह्यात, माजी मंत्री पंकजाताई च्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिर चळवळ उभा केली होती. ज्यात सामान्य रुग्णांचा फार मोठा फायदा झाला .एवढेच नव्हे तर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ,खासदार तथा पंकजाताई च्या माध्यमातून पाच वर्षात दीडशे कोटी रुपये पेक्षा अधिक विकास निधी आला .ज्यामुळे रुग्णालयातील मूलभूत सुविधा मार्गी लागलेल्या आहेत. ज्याचा फायदा आज मानवी जीवाच्या संकटात रुग्णांचे जीव रक्षणासाठी होतो .ही दूरदृष्टी मुंडे भगिनी मध्ये आहे. म्हणून आज मुंबईहून येताच त्यांचा पाय थेट कोविड सेंटरमध्ये पडला .ज्यामुळे सर्वसामान्य जनता आणि रुग्ण यांना दिलासा मिळाला. पुढील दहा दिवस त्या जिल्ह्यात असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचा आढावा पण घेतील. बाकी काही असले तरी खासदारांच्या संवेदनशील भूमिकेचं सर्वसामान्य जनतेमधून कौतुक होत आहे .