खापरटोन ता.अंबाजोगाई येथील जावयाच्या खुनाच्या गुन्ह्यातून सासऱ्याची व मेव्हण्याची अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मंजुर.

सदरील प्रकरणात थोडक्यात हकीकत अशी की दि.५/६/२०२० रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ग्यानबा सोपान मुसळे चा मयत भाऊ ज्ञानोबा दारू पिऊन घरी आला व त्यांच्या पत्नी मंजुळा सोबत मोठमोठ्याने आरडाओरडा करून घरातील वस्तू उचलून फेकू लागला त्यावेळी फिर्यादी ने समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो दारू पिलेला असल्याने एकण्याच्या स्थीतीत नव्हता ,त्याचा गोंधळ पाहून त्याची पत्नी मंजुळाअंदाजे साडे दहा वाजता गावातच असलेल्या तिच्या माहेरी निघून गेली.अंदाजे आकरा वाजता मयत भाऊ त्याच्या पत्नी ला मुलांना बोलावण्यासाठी त्याच्या सासऱ्याच्या घरी गेला होता. दि.६/६/२०२० रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान गावातील लोक चर्चा करीत होते की शाळेत कोणीतरी माणूस मारून टाकला आहे ,यावेळी फिर्यादी ने गावातील शाळेतील पाण्याच्या टाकीजवळ जाऊन पाहिले तर तो फिर्यादी चा भाऊ असल्याचे दिसले त्याचे डोकीत,पाठीवर ,कोणीतरी मारहाण करून त्यास जिवे मारून खुन केला आहे.त्यानंतर गावातील लोकांनी पोलीस स्टेशन येथे फोन करून माहिती दिली,पोलिसांनी येऊन पंचनामा करून प्रेत ताब्यात दिले.अशी आरोपीविरुद्ध फिर्याद दिली आणि फिर्यादी च्या आई ने फिर्यादीला दि ७/६/२०२० रोजी सांगितले की दि६/६/२०२०रोजी रात्री मी घराबाहेर बाजावर बसले असता,मध्यरात्री शाळेजवळ मयत मुलगा व त्याचा सासरा यांच्या भांडणाचा आवाज येत होता,मुलाचा ओरडल्याचा आवाज येत होता व थोड्या वेळाने आरोपीच्या मुलाचा बोलण्याचा आवाज येत होता असे सांगितले अश्या प्रकारची फिर्यादी ग्यानबा मुसळे व त्याची आई किसनबाई मुसळे यांच्या पुरवणी जवाबा वरून आरोपी १)विठ्ठल@राजाभाऊ पि धनराज चाटे २) धनराज पि हरिबा चाटे यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन बर्दापूर येथे कलम ३०२ भा.द.वि प्रमाणे नोंदवण्यात आला,आणि त्यांना अटक करण्यात अली नंतर सदरील प्रकरणात तपास करून आरोपीविरुद्ध अंबाजोगाई प्रथमवर्ग न्यायालयात आर.सी.सी.१२८/२०२०असे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सदरील प्रकरणात आरोपिच्या वतीने अँड.ए. बी.कवडे यांनी आरोपींना जामीन मिळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय अंबाजोगाई येथे जामीन अर्ज दाखल केला त्याचा जामीन अर्ज क्र.२९३/२०२० विठ्ठल विरुद्ध सरकार असा होता, सदर प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात झाली असता,आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद गृहीत धरून आरोपींची कलम ३०२भा.द.वि या गुन्ह्यातून जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.३ एम.बी.पटवारी मँडम यांनी दि.११/८/२०२० रोजी आरोपींची सशर्त जामीन मंजूर केली. सदरील प्रकरणात आरोपी तर्फे अँड.अशोक कवडे यांनी काम पाहिले व त्यांना अँड.डी.डी. गंगणे,अँड.एस. बी.करपे,अँड.आर.एस. सापते,अँड.लखन गायकवाड यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *