खाजगी डॉक्टरांकडुन होणारी कोरोना रुग्णांची हेळसांड थांबवा ; सलीम अध्यक्ष!

बीड : राज्यभरात वाढत चाललेली कोराना रुग्ण संख्या अत्यंत चिंताजनक असून, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने चांगले उपचार दिले जात असतानाच अधिगृहित करण्यात आलेल्या खाजगी डॉक्टर व रुग्णालयाकडून मात्र कोराना बाधीतांच्या उपचारासाठी निर्धारित करण्यात आलेल्या दरपत्राका एैवजी अत्यंत मनमानीप्रमाणे शुल्क आकारणी होत असून ॲडव्हान्स म्हणून लाख ते दिड लाख्‍ रुपये जमा करण्याची सूचना चक्क फलक लावून केली जात आहे. सलीम अध्यक्ष युवा मंच संस्थापक अध्यक्ष सलीम शेख यांनी रुग्णा विषयी होणारी आडवनूक व आकारण्यात येणारे चुकीचे शुल्क याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.
राज्य भरात कोरोना बाधीत रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी बेड्स अनेक ठिकाणी कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यभरातील खाजगी दवाखाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अधिगृहित केले आहेत. परंतु अनेक ठिकाण कोरोना बाधीतांवरल उपचारासाठी देण्यात आलेल्या शासन मान्य दरानुसार रउपचार होतांना दिसुन येत नाही. काही ठिकाणी तर डॉक्टरांनी कोरोना रुग्ण उपचारा दर पत्रक आपल्या रुग्णालया समोरच लावलेले असून ते उपचाराचे ॲडव्हान्स म्हणुन किमान दिड लाख रुपये जमा केल्यानंतरच उपचार सुरू केले जातील असे स्पष्ट पणे नमूद करण्यात आले आहे. याकडे सलीम शेख यांनी प्रशासनाकडे लक्ष वेधले आहे.
कोराना रुग्णांची वाढत चालेली संख्या चिंतेचा विषय असतांना मात्र अनेक खाजगी डॉक्टर्स्अव्याच सव्वा उपचार शुल्क म्हणुन रुग्णाकडुन आकारत असल्याचे सलिम शेख यांनी म्हटले आहे. खाजगी डॉक्टरांना नविन कोरोना रुग्ण्‍ सरकाच्या परवानगी शिवाय दाखल करुन घेता येत नाही. त्यासाठी लॉगीन आयडी व पासवर्ड दिला जात असतो. महारष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागने जनरल वार्ड विलगीकरण यासाठी 4 हजार आसीयुसाठी 7500 आणि व्हेंटीलेटर सह उपचारासाठी 9 हजार रुपये असे दर निश्चित केले आहेत. काही ठिकाणी वेगवेगळ्या तपासणीच्या नावाने अधिक रक्कम उपचार शुल्क म्हणुन खाजगी डॉक्टरांकडुन संकलीत केली जात आहे. रुग्ण अणिबानीच्याप्रसंगात दाखल होत असतांना त्यांच्याकडे ॲडव्हास रक्कम भरण्यासाठी लाख रुपये असू शकतात का. याचा विचार ही खाजगी उॉक्टरांकडुन केला जात नाही. निर्धरीत शुल्काशिवाय पीपीई किट, विविधतपासण्या, धातीतल व पोटातील पाणी काढणे, सिटीस्कॅन अशा विविध तपासणीसाठी शुल्काची आकारणी केली जात असतांना शुल्क निर्धारण कलेले असतांना खाजगी डॉक्टरांकडुन रुग्णांना वेठीस धरणे चुकीचे आहे. शासकीय दरपत्राका नुसारच रुग्णांची तपासणी उपचार व्हावेत, ॲडव्ळान्सची सक्ती केली जाऊ नयेयासाठी आपल्या आरोग्य विभागाकडुन योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. दरम्यान खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर डिस्चार्ज होते वेळी उपचार करण्यात आलेल्या सर्व रक्कमेचा पावत्या डॉक्टरांचे प्रिस्क्रप्शन, लावण्यात आलेली खाजगी औषधी अदिंच्या पावत्या रुग्णांनीजपुन ठेवणे आवश्क आहे. शासनााने जरी खाजगी रुग्णालयातील उपचार चार्चाची तरतुद केली तर आपण दिलेली रक्कम परत मिळण्याची शक्यात असू शकते. अशा वेळी या पावत्या उपयुक्त ठरतील. तेंव्हा रुग्णांनी सर्व पावत्यांचे जतन करावे, असे आव्हान सलीम अध्यक्ष युवा मंच संस्थापक अध्यक्ष सलीम शेख यांनी जनहितार्थ केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *