खरीप हंगामातील पीक कर्जाची मुदत वाढवा किसान काँग्रेस चे मराठवाडा अध्यक्ष अॅङ माधव जाधव यांनी केली मागण
अंबाजोगाई: शेतकरी बांधवांच्या खरीप हंगामातील पीक कर्जाची मुदत 30 सप्टेंबर 2020 असून कोवीड 19 व कोरोना च्या संकटामुळे अनेक बॅका बंद होत्या.तसेच अनेक बॅक कर्मचा-याना कोरोना झाल्यामुळे अनेक कर्मचारी होम काॅरंटाईन आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या खरीप हंगामातील पीक कर्जाच्या फाईल प्रलंबित आहेत. अशातच खरीप हंगामातील पीक कर्जाची मुदत 30 सप्टेंबर 2020 आहे. अनेक बॅका मुदत संपत आल्यामुळे खरीप हंगामातील पीक कर्ज शेतकरी बांधवांना नाकारत आहेत. अंबाजोगाई येथील बॅक आॅफ इंडिया च्या मॅनेजर नी सायगाव येथील शेतकरी बांधवांच्या पीक कर्जाची प्रकरणे याच कारणामुळे नाकारली होती. ही माहिती किसान काँग्रेस चे मराठवाडा अध्यक्ष अॅङ माधव जाधव यांना झाल्यानंतर अॅड माधव जाधव , प्रहार संघटनेचे राजेश काळुंके, दर्पण न्यूज चॅनलचे परमेश्वर सोनवणे, किसान काँग्रेस चे बीड जिल्हाध्यक्ष ( पुर्व ) यशवंत सोनवणे यांनी बॅक मॅनेजर ची भेट घेऊन त्याबाबत विचारणा केली असता मुदत संपत आल्यामुळे खरीप हंगामातील पीक कर्जाची प्रकरणे मंजूर करता येणार नाहीत असे सांगितले. अॅड माधव जाधव यांनी अंबाजोगाई तहसीलदार व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना याबाबत विनंती करून तोडगा काढण्यास सांगितले. त्यानंतर मॅनेजर नी पर्यायी व्यवस्था करून सायगाव येथील शेतकरी बांधवांच्या पीक कर्जाची प्रकरणे मंजूर करण्याचे आश्वासन दिले . परंतु हा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा प्रश्न असल्यामुळे व शेतकरी बांधवांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी किसान काँग्रेस चे मराठवाडा अध्यक्ष अॅङ माधव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेब व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय ऊद्धवजी ठाकरे साहेब यांना ई मेल द्वारे विनंती करून खरीप हंगामातील पीक कर्जाची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायला नकार देणाऱ्या बँक ऑफ इंडिया अंबाजोगाई शाखेला किसान काँग्रेस चे मराठवाडा अध्यक्ष अॅङ माधव जाधव, प्रहार संघटनेचे राजेश काळुंके, दर्पण न्यूज चॅनलचे परमेश्वर सोनवणे, किसान काँग्रेस चे बीड जिल्हाध्यक्ष ( पुर्व ) यशवंत सोनावणे यांनी भेट देऊन बँक मॅनेजरला खडेबोल सुनावले त्यावेळेसचं तात्काळ बँकेने शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे मान्य केले. शेतकऱ्यांची अडवनूक कदापि सहन केली जाणार नाही.