खडकनारळा ग्राम पंचायतकडून थर्मल गणने नागरिकांची तपासणी
गंगापूर (प्रतिनिधी) – नागरिकांच्या आरोग्यासाठी खडकनारळा ग्रामपंचायतीत ऑक्सिमिटर व थर्मल गण टेस्टिंग तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.गंगापूर तालुक्यातील खडकनारळा ग्रामपंचायत कडून कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीची तपासणी करण्यासाठी ऑक्सिमिटर व थर्मल टेस्टिंग गण उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळे गावात आलेल्या व्यक्तींची तपासणी करणे सोपे झाले गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील आरोग्य सेवक उन्मेष उबाळे यांनी तपासणी कशी करायची याचे प्रात्यक्षिक करून दाखविले अंगणवाडी सेविका टी एस मुंजाळ यांनी गावातील 55 वर्ष व त्यावरील व्यक्तींची घरोघरी जाऊन नोंद घेतली याप्रसंगी ग्रामसेवक वाय. एस. ढोकर, सरपंच नंदाबाई शिंदे, उपसरपंच खलील शहा पोलीस पाटील एस आर मुंजाळ, आशा सेविका सीमाली थोरात, ग्रामपंचायत शिपाई गणेश थोरात, ग्रामपंचयत सदस्य रेवणनाथ थोरात, शांताराम मुंजाळ, व भाऊसाहेब कीर्तिकर, व गांवकरी उपस्थित होते.