कोरोना : 28 रूग्णांची भर पडल्याने जिल्ह्यची एकूण संख्या 648

जालना (प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यात आज शुक्रवारी सकाळी 28 नवीन कोरोना बाधित रूग्णांची भर पडली असून त्यात 17 रुग्ण हे जालना शहरातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 648 वर पोहचली आहे.जालना जिल्हा रुग्णालयातर्फे काल गुरुवारी जवळपास दीडशे संशयीत रुग्णांचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही अहवाल आज शुक्रवारी सकाळी प्राप्त झाले असून त्यात 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. जालना शहरातील मूर्तीवेस 5,काद्राबाद 4,अग्रेसननगर 2,एस.टी. कॉलनी,गोपालपुरा, मेनरोड चंदनझिरा, नया बाजार,सुवर्णकार नगर या भागात प्रत्येकी 1 रुग्ण असून मसलापूर 1 तसेच भोकरदन येथील कलश मंगल कार्यालय 4, भोकरदन येथील तुळजा भवानी नगर 3,धावडा येथे 1,वॉलसा वडाळा 1, शारदा नगर अंबड 2,जाफराबाद 2 या प्रमाणे 28 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान,आणखी काही अहवाल प्रयोग शाळेकडून प्राप्त होणार असल्याने या संख्येत दिवसभरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *