कोरोना संदर्भात परळीतील ५३४ जणांचे घेतले स्वॅब
परळी प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखयासाठी परळीतील ५३४ जणांचे कोविड केअर सेंटरने स्वॅब घेतले असुन ते स्वॅब स्वाराती रूग्णालय अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. परळी येथिल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचार्यांच्या संपर्कात आलेल्या १५०० लोकांची प्रशासनाने यादी तयार केली होती त्या यादीच्या अनुषंगाने परळी व परळी शहरातील ५३४ स्वॅब जणांचे स्वॅब घेण्यात आले. परळी सारख्या छोटया शहरामध्ये मोठया प्रमाणात स्वॅब घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिनेश खुळमे,ता.आरोग्य अधिकारी डॉ.मोरे,यांच्यासह डॉक्टर,कर्मचारी,तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्यासह न.प.प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी व पोलिस निरीक्षक हेमंत कदम, बालासाहेब पवार,यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि संबंधित कर्मचार्यानेही अथिक परिश्रम घेतले